Posts

कविता

ज्याच्यावर आपण  सर्वात जास्त प्रेम करतो तोच   आपल्याला,   सर्वात जास्त  दुःख देतो सारीच   माणसं   असतात आपण  देव  माणूस करतो तो  माणसासारखा वागला की देव्हाऱ्यातला देव मरतो जरी सर्वांच्याच नशिबी सर्वच गोष्टी येत असतात तरी सर्वांनाच सर्वच गोष्टी मिळत सुद्धा  नसतात समीकरणं जरी वेगवेगळी असली तरी आयुष्याची  गणितं मात्र तीच असतात कुणासाठी हळहळणे, किव करणे यासाठी आपली योग्यता नसते अपवाद  भासणाऱ्या हर  मुखवट्या मागे वेगळ्या मुद्यावरची एक दुखरी नस असते किशोर पांडे २०११२०२०

आरसा

व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाशी स्वतंत्र स्वीकृती कुणी आवडतो नामी कुणी आवडतो कमी आचार त्यानुसार, हर एकाशी थोडे भिन्न आपल्यावर आले की, डोके मात्र सुन्न आपणही नकळत तसेच वागतो, मग प्रत्येक ठिकाणी भरभरून का मागतो मिळतंय तिथे लाजू नये अधिक मिळालं तर माजू नये जगात  प्रेमाची  मुळीच  कमतरता नाही फक्त, हवं तिथून मात्र नेमकं मिळत नाही किशोर पांडे १९, सप्टेंबर २०२०

खोफ

खुदिको बुलंद कर करके अब पुरा थकसा गया हूं, ना मेरी परेशानिया रुकती है ‌न तो खुदा मेरी रझा पुछता है. ‌हर शक्स यंहा उलझा है ‌मैं कौनसा बडा रुस्तम हूं, तवज्जू तक नही चाहता इतना मैं नाचीज हूं. नजर करता हूं हर शेर,  खुदिको  बडे अकेलेमे, मुझसे बेहेतर, और कौन जानता मुझे, बडे अकेलेमे. क्यों किसे खुशी दू, अपने गम बाटके, रहने दे वहम बचे दिन काटके. -किशोर पांडे २  जुलै २०२०

पाऊस

पेला अर्धा भरला आहे अर्धा आहे रिकामा भरू या पेल्यात पाऊस भागवून थोडी हौस बसणे घरात,  सत्कारणी लावू "करोनाच्या आईचा घो, करोना गो" निरोपाचे गीत एकत्र गाऊ अमृत पिणाऱ्या मित्रांना निमंत्रण-पूर्वक समर्पित किशोर पांडे १५०७२०२०

करोना

काटने लगी है जिंदगी, काटते काटते हर लम्हां महसुस होने लगे सिकुडके,  और तनहा तनहा गुजरना है जो भी, गुजरके रहेगी रहमत भी तो फिर भी, बरसती रहेगी   इस मसलेका का भला, क्यो खोफ़ हो दिलमे जब मुसीबीतोमे पुरी जिंदगी, गुजारी है हमने क्या बिगाडा है  अबतक, जो अब बिगाड लेंगे रख भरोसा मालिकपर, हम सब महफूजही रहेंगे जश्नका दिन जल्द ही आयेगा गीत खुषीका हर दील गाएगा   किशोर पांडे १५ जुलै २०२०

कौतुक

नशा कौतुकाची, दारू पेक्षा प्रभावी असते, परिणाम दोन्हीचा एकच, जगाची भ्रांत नसते. हव्यास प्रशंसेचा, बाटली पेक्षा तीव्र असतो, गरजेपोटी नकळत, व्यसन वाढवत असतो. प्रवास दारूचा पोटातून मस्तकापर्यंत, लांबचा असतो, स्तुती मात्र कानातून थेट डोक्यात, शॉर्ट कटचा असतो. कुठे थांबायचे एव्हढे कळले पाहिजे, वेळीच नरडे नशेचे आवळले पाहिजे. किशोर पांडे ८०७२०२

व्हाट्सएप

लॉक डाऊनच्या काळात, एकटे पडलो असतो. अडचणींच्या काहूरात, पुरते गुरफटलो असतो. नशीब आपलं थोर म्हणून, व्हाट्सएपची साथ आहे. बोलाचा का होईना, भुकेला वरण-भात आहे. धर्मपंडिनांनी कृतज्ञतेची, वेळीच दखल घ्यावी. यथाशीघ्र व्हाट्सएप नवमी, पुजायला जाहीर व्हावी. किशोर पांडे १२०७२०२०