कविता

ज्याच्यावर आपण 
सर्वात जास्त प्रेम करतो
तोच   आपल्याला,  
सर्वात जास्त  दुःख देतो

सारीच   माणसं   असतात
आपण  देव  माणूस करतो
तो  माणसासारखा वागला
की देव्हाऱ्यातला देव मरतो

जरी सर्वांच्याच नशिबी सर्वच गोष्टी येत असतात
तरी सर्वांनाच सर्वच गोष्टी मिळत सुद्धा  नसतात
समीकरणं जरी वेगवेगळी असली तरी
आयुष्याची  गणितं मात्र तीच असतात

कुणासाठी हळहळणे, किव करणे
यासाठी आपली योग्यता नसते
अपवाद  भासणाऱ्या हर  मुखवट्या मागे
वेगळ्या मुद्यावरची एक दुखरी नस असते


किशोर पांडे
२०११२०२०

Comments

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ