कौतुक
नशा कौतुकाची, दारू पेक्षा प्रभावी असते,
परिणाम दोन्हीचा एकच, जगाची भ्रांत नसते.
हव्यास प्रशंसेचा, बाटली पेक्षा तीव्र असतो,
गरजेपोटी नकळत, व्यसन वाढवत असतो.
प्रवास दारूचा पोटातून मस्तकापर्यंत, लांबचा असतो,
स्तुती मात्र कानातून थेट डोक्यात, शॉर्ट कटचा असतो.
कुठे थांबायचे एव्हढे कळले पाहिजे,
वेळीच नरडे नशेचे आवळले पाहिजे.
किशोर पांडे
८०७२०२
Comments
Post a Comment