व्हाट्सएप

लॉक डाऊनच्या काळात,
एकटे पडलो असतो.
अडचणींच्या काहूरात,
पुरते गुरफटलो असतो.

नशीब आपलं थोर म्हणून,
व्हाट्सएपची साथ आहे.
बोलाचा का होईना,
भुकेला वरण-भात आहे.

धर्मपंडिनांनी कृतज्ञतेची,
वेळीच दखल घ्यावी.
यथाशीघ्र व्हाट्सएप नवमी,
पुजायला जाहीर व्हावी.


किशोर पांडे
१२०७२०२०






 

Comments

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ