आरसा

व्यक्ती तितक्या प्रकृती
प्रत्येकाशी स्वतंत्र स्वीकृती
कुणी आवडतो नामी
कुणी आवडतो कमी

आचार त्यानुसार, हर एकाशी थोडे भिन्न
आपल्यावर आले की, डोके मात्र सुन्न
आपणही नकळत तसेच वागतो, मग
प्रत्येक ठिकाणी भरभरून का मागतो

मिळतंय तिथे लाजू नये
अधिक मिळालं तर माजू नये
जगात  प्रेमाची  मुळीच  कमतरता नाही
फक्त, हवं तिथून मात्र नेमकं मिळत नाही



किशोर पांडे
१९, सप्टेंबर २०२०

Comments

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ