जगणे आनंदाने

क्रमवारीने, सुख-दुःखाच्या सरी,
घरबसल्या, बरसती वरचेवरी.

करणे होते, निमित्त जरी,
कारण ठरते, ठपका उरी.

जर- तर , खरे काही नसते,
होणे तेच, व्हायचे असते.

छोट्या छोट्या समाधानाचे तलाव व्हावे,
उसन्या आनंदाचेही अखेर कर्ज व्हावे.

वावरती असंख्य उत्साही चेहरे,
त्यांना पण असावेत क्लेश खरे.

आनंदाने जगणे ही कला असावी,
उदासीनतेही ती, अवगत व्हावी.

विविधतेही एकता आहे, प्रत्येकाला,
जुन्या दुखण्यासोबत, ब्रँड न्यू करोना आहे.


किशोर पांडे
१७ ऑगष्ट, २०२०


Comments

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ