मुंबईकर

मुंबईकर एकमेकांच्या श्वासावर जगतो
जेंव्हा तो गच्च भरलेल्या लोकल मध्ये असतो

समोरच्याची उचकी,ढेकर चक्क लाईव्ह शेअर करतो
जेंव्हा पोटाला पोट भिडवून कसाबसा उभा असतो

सहवासातील वास, सहन करतो
जेंव्हा जीवघेणा प्रवास दररोज करतो

एव्हढी घट्ट अनोळखी मैत्री, करोनालाही दाखवतो
जेंव्हा एकजुटीने, आपापल्या घरात बसतो


किशोर पांडे
३० जुलै, २०२०

Comments

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ