कडवट नशा

असो मधुर बासुंदी तरी,  कडवट नशेची धुंदी अलग आहे, 
सुखाच्या दालनात, विदारक व्यथेला वेगळी चव सलग आहे.

जिना संपत आला तरी,  पायरी अजून पहिलीच आहे,
अपयशाची आहे, मात्र प्रयत्न अजून सुरूच आहे.

आनंदात असला जीव की,  अनामिक भीती वाटते,
परक्याचे जिणे तर जगत नाही ना, याचीच शंका वाटते.

साम्राज्यात घाणीच्या,  थोडी मशागत अजून करणार,
चिखल तर भरपूर केलाय, कमळ मात्र नक्की फुलणार. 

कमळ प्रेमाचे प्रेमाला प्रेमाने करतो अर्पण,
मनात केलेल्या घराला, लाभो तुला घरपण.


किशोर पांडे
२२.०७.२०२०

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ